आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुनिसेफ, महिला व बालविकास विभाग, एसबीसी, नेहरू युवा केंद्र व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सक्षम युवा शक्ती दिन’ हा उपक्रम २९ व ३० नोव्हेंबर रोजी दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आला. या अंतर्गत किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लिंग समानता यावी यासाठी, मुलांची रांगोळी तर मुलींची थ्रो बॉल स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर गावामध्ये प्रभात फेरी घेण्यात आली.
गावांमध्ये बालविवाह निमित्त़ पथनाटयाचे आयोजन करण्यात आले व पथनाट्यामधून बालविवाहाचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे मुलीच्या आरोग्यावरील परिणाम बददल गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कोमल चाटे, राधाबाई ढवळे, विष्णु पिवळ, गणेश ढवळे, वसंत सुर्वे, बाळकृष्ण साळुंके यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.