आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी जाहीर सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार अंबादास दानवे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी त्यांचा सत्कार केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम होईल. या वेळी पदाधिकारी मेळावाही होणार आहे.

या सत्कार समारंभाला उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास किसान सेनेचे भानुदास घुगे, दलित आघाडी जिल्हा संघटक अ‍ॅड. भास्करराव मगरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सविता किवंडे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, रमेश गव्हाड, बाबासाहेब तेलगड, भगवान कदम आदी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...