आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापक वर्गातून अभिनंदन:गझल काव्यातील वसंत गझल संग्रहाचे प्रकाशन

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जेईएस महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. वसंत उगले यांच्या गझल काव्यातील वसंत या ई गझल संग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गझल गायक अतुल दिवे यांच्या हस्ते झाले.येथील जे. ई. एस महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. उगले यांच्या ‘गझल काव्यातील वसंत’ या ई - गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी सुप्रसिद्ध गझल गायिका वैशाली राजेश, बेल्जियम येथील हिंदी गझलकार कपिल कुमार, डॉ. सर्जेराव जिगे, जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी बगडिया, सचिव श्रीनिवासजी भक्कड, उपाध्यक्ष फुलचंदजी भक्कड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, मराठी विभागप्रमुख डॉ. यशवंत सोनुने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रणमाळ, डॉ. फुलचंद मोहिते, डॉ. राजेंद्र सोनवणे आणि महाराष्ट्रातील नामवंत गझलकार आणि प्रेक्षकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती. या ई-गझल संग्रहाचे मुखपृष्ठ स्वतः डॉ.उगले यांनीच रेखाटलेले आहेत. त्यांच्या या परिश्रमाचे जेईएस महाविद्यालय संस्थेचे पदाधिकारी, डॉ. तसेच प्राध्यापक वर्गातून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...