आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात शोककळा:जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांना अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी जगाचे निरोप घेतले. त्यांच्या अशा जाण्याने संपुर्ण राजकारणात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर मंगळवारी दुपारी मूळगाव पिंपळगाव ता. भोकरदन जि. जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एक प्रामाणिक देशभक्त, माजी खासदार, अनेक चांगला राजकीय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

चार दिवसांपूर्वी पत्नी केशरबाई दानवे यांचे निधन

पुंडलीकराव दानवे हे 1977 व 1989 असे दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जनसंघाचा दिवा घरोघरी लावून झाली. नांगरधारी शेतकरी व भाजपच्या कमळ निशाणी वर ते निवडून येऊन खासदार झाले मात्र त्यांना पूर्ण पाचवर्षं सत्ता कधी लाभली नाही. वृद्धपकाळातील आजाराने औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

पती-पत्नीची एकमेकांना शेवटपर्यंत साथ होती. दोघांचा मृत्यू चार दिवसाच्या अंतरावर झाले असून त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे यांचे नुकतेच निधन झाले होते. पुंडलिक हरी दानवे हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून परिचित होते.

दोन वेळेस खासदार असूनही अत्यंत साधी राहणी, रांगडी भाषा व प्रखर तितकेच प्रेमळ शब्द बोलणे, प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे उत्कृष्ट वक्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या याच भाषण शैलीमुळे त्यांच्या राजकीय विरोधकांनाही त्यांचे मार्गदर्शन व सभेतील भाषण ऐकण्याचा मोह आवरत नसे. पुंडलिकराव दानवे यांना भाजप ने जालन्यातून पाच वेळा उमेदवारी दिली.

मात्र, नंतर झालेल्या लोकसभा निवडकीत पक्षाने पुन्हा एकनिष्ठ निष्ठावंत पुंडलिकराव दानवे यांना उमेदवारी नाकारून उत्तमसिंग यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून त्यांचा भाजपशी दुरावा वाढत गेला. त्यानंतर भोकरदन विधानसभा पोटनिवडणुकीत पुंडलिकराव दानवे यांनी पुत्र चंद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवले. त्यांनतर त्यांच्या त्यांचे पुत्र चंद्रकांत दानवे तीन वेळा आमदार झाले. पुढे पुंडलिकरावांचे वय वाढूनही ते तरुणांना लाजवेल असा त्यांचा काम करण्याचा जोश पाहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असे.

बातम्या आणखी आहेत...