आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:अत्याचार करणाऱ्यास शिक्षा ; अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अंबड न्यायालयाकडून दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अशोक गुलाबराव वाघमारे (कोठाळा, ता. घनसावंगी) असे आरोपीचे नाव आहे. अशोक वाघमारे याने २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपीस पकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. यात सात जणांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी आरोपीस दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...