आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य उपकेंद्र:महिला डॉक्टरची छेड काढणाऱ्याला शिक्षा ; न्यायालयात दोषारोपत्र दाखल

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला डॉक्टरची छेडछाड करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एम. मोहिते यांनी एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ज्ञानेश्वर नारायण कुदळे (२३ रा. सुरंगळी ता. भोकरदन) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी ज्ञानेश्वर कुदळे हा १८ मार्च २०२१ रोजी भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील आरोग्य उपकेंद्रात गेला. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, मला औषधी द्या असे म्हणून त्याने महिला डॉक्टरची छेड काढली. नंतर महिला डॉक्टरच्या घरात जाऊन सासऱ्यास लाथबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक एस. डी. नाईक यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पंच, साक्षीदार, डॉक्टर व पोनि. नाईक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपीला एक वर्ष शिक्षा व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशोक मते यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...