आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार:आष्टीच्या कृषी बाजार समितीच्या शुभारंभात 100 क्विंटल शेतमालाची केली खरेदी

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्री व्यवहार मुख्य प्रशासकामार्फत सोमवारी बिट पध्दतीने चालू करण्यात आले. यात शुभारंभातच शेतकऱ्यांचा १०० क्विंटल शेतमाल खरेदी करण्यात आला. प्रथम दोन शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.परतूर तालुक्यातील आष्टी हे मोठी बाजारपेठ आणि मोठी ग्रामपंचायतचे गाव आहे. तीन जिल्ह्याच्या हद्दीवर असल्याने आष्टी येथे जवळपास परिसरातील चाळीस गावातील शेतकरी येथे शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी येतात.

मात्र तेथील कृषी उत्पन्न बाजार पेठ मागील अनेक वर्षांपासून बंद असल्याने येथील शेतक-यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना विक्री करत मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा भावामुळे हिरमोड होत. ही बाब लक्षात घेत गेल्या वर्षी सर्व संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करुन बिट पध्दतीने शेतमालाची खरेदीचा शुभारंभ करत अल्पावधीत येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ केली. परिणामी शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग पण समाधानी झाले होते.

यावर्षी सरकार बदलल्याने पुर्व प्रशासक संचालकांच्या नियुक्ता रद्द करण्यात आल्याने मुख्य प्रशासक एस. एन. बारगजे, सचिव कैलास मुजमुले यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात खरेदी - विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यात १०० क्विंटल शेतमाल खरेदी करण्यात आला, कृष्णा थोरात (आष्टी) अच्युत प्रधान (चांगतपुरी) या दोन शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान गतवर्षी प्रमाणे याही वर्षी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करुन मदतीचा हातभार देण्याचे काम होत आहे.

यावेळी राम सोळंके, कृष्णा टेकाळे, बाळाभाऊ मिठे, वैभव दराडे, गणेश वाघमारे, अमोल सारडा, पवन जाजु, भागवत जगताप, देवीदास आढे, बाळासाहेब कोल्हे, पुजा शेटे, लक्ष्मण सवांदे, गणेश पेशवे, सुभाष शिंदे, वासुदेव सोळंके, बबन राऊत, बापु जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीच्या यार्डात खरेदी-विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सचिव मुजमुले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...