आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामजूर फेडरेशनसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत २३१पैकी २०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वसाधारण गटासाठी १६ उमेदवार बिनविराेध झालेले असल्याने सर्वसाधारण (धरणगाव), इतर मागासवर्गीय व महिला राखीव या तीन मतदारसंघांसाठी मतदान झाले. धरणगावच्या माजी नगराध्यक्षा रत्नाबाई (पुष्पा) ज्ञानेश्वर महाजन व त्यांचे पती ज्ञानेश्वर भादू महाजन यांनी तिन्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली हाेती. मात्र या दांपत्याला तिन्ही ठिकाणी केवळ एकमेव मत मिळाल्याने त्यांच्यावर डिपाॅझिट जप्त हाेण्याची वेळ अाली.
या दाेघांनी मतदानाचा हक्कच बजावलेला नसल्याने त्यांना मिळालेले मतही प्रत्यक्षात त्यांचे नाही. मजूर फेडरेशनच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या स्वातंत्र्य चौकातील कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतदान झाले. मजुरांच्या २८२ संस्थांपैकी २३१ सभासदांनीच मतदानाचा ठराव केल्याने २३१ मतदारच मतदानासाठी पात्र हाेते. ज्ञानेश्वर महाजन यांनी सर्वसाधारण (धरणगाव) व इतर मागासवर्गीय या दाेन मतदारसंघातून अर्ज दाखल केला हाेता. सर्वसाधारण (धरणगाव) मध्ये ते दिलीप उत्तमराव धनगर यांच्या विराेधात उभे हाेते. त्यांना एक मत तर दिलीप धनगर यांना २०७ मते पडून ते विजयी झाले.
इतर मागासवर्गीय मतदार संघात ज्ञानेश्वर महाजन हे राेहिदास मधुकर पाटील यांच्या विराेधात उभे हाेते. येथेही महाजन यांना केवळ एक मत मिळाले. तर २०६ मतांसह राेहिदास पाटील हे विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघात तिहेरी लढत हाेती. पुष्पा महाजन यांना केवळ एक मत मिळाले. १९९ मतांसह महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ दुसऱ्यास्थानी राहिल्या. तर राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील यांना सर्वाधिक २०६ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. मजुरांच्या संस्थांचे सदस्य असलेले अनेक मतदार अापल्या कारमधून मतदानासाठी आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.