आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:झोपडपट्टीवासीयांची समाजसेवेतून भागवली तहान; लायन्स क्लब आणि आदर्श भगिनी मंडळाच्या माध्यमातून उपक्रम

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपडपट्टीत राहणाऱ्या स्थलांतरित नागरिकांसाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी लायन्स क्लब ऑफ जालना आणि आदर्श भगिनी मंडळ जालना यांच्या माध्यमातून साठ दिवसांचा सेवाधर्म उपक्रम राबवला. १८ एप्रिल ते १९ जून दरम्यान दररोज टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप शनिवारी झाला.

जालना शहरातील नवा मोंढा रोड परिसरातील श्रीकृष्ण रुक्मिणीनगर परिसरात बाहेरगावाहून पोटाची खळगी भरण्यासाठी येऊन पाल टाकून झोपडपट्टी भागात राहणाऱ्या फिरस्ती जनतेची पाण्याअभावी उन्हाळ्यात तारांबळ होत होती. दूरपर्यंत कुठेच पाणी नसल्याने आणि विकत घेऊन तहान भागविणेही शक्य नाही, ही बाब विचारात घेऊन लायन्स क्लब ऑफ जालना यांच्या सदस्यांनी बैठक घेत नियेाजन केले. याला आदर्श भगिनी मंडळ जालना यांची साथ मिळाली. १८ एप्रिल रोजीपासून या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून टँकरद्वारे स्थलांतरित झोपडपट्टीधारकांना पाणी पुरवण्याला सुरुवात झाली.

या उपक्रमासाठी कमलबाबू झुनझुनवाला यांच्यासह आदर्श भगिनी मंडळाच्या अध्यक्षा चंदा करवा, मीनाक्षी दाड, सुनीता मालपानी, पद्मा लड्डा, मंगल कासट, कविता राठी, विजया मोहता, मीनाक्षी सोनी, कलावती राठी, सुषमा पायगव्हाणे, पुष्पा अग्रवाल, कांता सोनी, सरिता बगडिया यांनी आर्थिक हातभार लावत आपले योगदान दिले. दरम्यान, लायन्सच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड म्हणाल्या की, लायन्स क्लबच्या माध्यमातून दोन महिने मोफत पाणी वाटपाचा करण्यात आले. अध्यक्षा चंदा करवा म्हणाल्या की, लायन्स क्लबमुळे आम्हाला सेवेची संधी मिळाली.

गरजूंना सेवा देण्याचे व्रत
संकटे सोडवण्यासाठी आम्ही शक्य होईल ते प्रयत्न करत आहोत. पाण्याची सुविधा सोडवण्यासाठी लायन्स क्लब तसेच आदर्श भगिनी मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले. ६१ दिवस सलग पाणी पुरवण्यात आले. परोपकाराच्या भावनेतून जालना लायन्स क्लब नेहमीच अमूल्य योगदान देत असल्याचे झुनझुनवाला म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...