आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगबग:जाफराबाद तालुक्यात रब्बी तथा उन्हाळी भुईमूग; काढणीला आला वेग, खरीप हंगामासाठीही लगबग

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील अनेक गावात शेतकरी सध्या भुईमूग काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत असून, खरिपाची तयारी देखील सुरु असल्याचे चित्र आहे. जाफराबाद परिसरात सध्या रब्बी तथा उन्हाळी हंगामातील भुईमूग शेंगा काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून, खरिपाची लगबग देखील पहायला मिळत आहे. यावर्षी परिसरात गोंधनखेड्यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी भुईमूग पिकांची पेरणी केली आहे. मजुरांच्या सहाय्याने भुईमूग शेंगांची काढणी केली जात असून जाफराबाद तालुक्यात यावर्षी काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा वगळता अनेक ठिकाणी विहीरी व‌ कुंपनलिकांची भुजल पातळी चांगली असल्याने रब्बी हंगामातील भुईमूग पिकांचे क्षेत्रफळही वाढले आहे.

परिसरात सध्या भुईमूग शेंगा काढणीचे काम करतांना मजुरवर्ग मोठ्या प्रमाणावर शेतशिवरात दिसत आहे. यामुळे मजुरांनाही ताळेबंदीच्या काळात रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच शेतकरी आपल्याकडे असलेल्या जनावरांना पावसाळ्यात चाऱ्याची कमतरता जाणवू नये यासाठी भुईमूग पिकापासून मिळणारा पाला जनावरांना चारा म्हणून साठवून ठेवण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे‌.

यावर्षी बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, मोठ्या प्रमाणात खर्च करुन अपेक्षित भाव न मिळाल्याने देखील शेतकरी नाराज आहे.

बातम्या आणखी आहेत...