आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेणुकाई भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन हजारो हेक्टरवर रब्बी पिकाची लागवड केली आहे. सध्या ही पीके चांगलीच बहरली आहे. माञ वन्यप्राण्यांचा शेतशिवारात वावर वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम वन्यप्राण्यामुळे हातचा जाण्याची भिती आहे.
कष्टाने जगविलेली रब्बीतील हरभरा, गहु, मका पिक वन्यप्राण्यांकडून रातोरात फस्त केली जात असल्याने ही पिके वाचविण्यासाठी जिव धोक्यात घालुन शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत असल्याचे चिञ पिंपळगाव रेणुकाई शिवारात मागील काही महिन्यापासुन आहे. तरीही वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मागील समाधानकारक पावसामुळे विहिरी, बोअरला मुबलक पाणी उपलब्ध झाले. परिणामी गहु, हरभरा, मका,ज्वारीसह इतर पिकांचा पेरा वाढला. सध्या गहु ओंब्यावर, हरभरा घाट्यावर आला आहे. महिनाभरात पिकाँची कापणी सुरू होणार असतानाच वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. रुही, रानडुकर, मोर, निलगाई, हरणांच्या कळपाकडून उभ्या पिकाची नासाडी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर वन्यप्राणी थेट पिकात घुसुन संपूर्ण पिक पिकच उद्धवस्त करीत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दरम्यान या भागातील शेतकरी रात्री वन्यप्राण्यापासुन पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून राञीचा खडा पहारा देत आहे. अनेक ठिकाणी रानडुकराकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत असल्याचा घटना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन पिकांची राखण करावी लागत आहे. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी वनविभागाकडे याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी ञस्त आहे. शिवाय वन विभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी शिवाजी देशमुख, रामेश्वर देशमुख,अमोल देशमुख, मंगेश देशमुख आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.