आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बी उत्पादन:मुबलक जलसाठ्यामुळे यंदा रब्बी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता

पिंपळगाव रेणुकाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील सहा ते सात वर्षांपासून नेहमीच पाण्याचा ठणठणाट पाहत असलेल्या भोकरदन तालुक्यातील १५७ गावातील शेतकऱ्यांना सलग चार वर्षांपासून मुबलक पर्जन्यमान होऊन पाऊस वार्षिक सरासरी ओलाडंत असल्यामुळे शेत परिसरात काही वर्षांपूर्वी झालेल्या लोकसहभाग व जलयुक्तच्या कामाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मागील वर्षीदेखील गावागावातील नदी-नाल्यात जवळजवळ कोट्यावधी लिटर पाणी साठून होते. त्यामुळे विहिरीतील जलसाठ्यात मोठी वाढ झाली होती. यंदा देखील तीच परिस्थिती कायम असल्याने शेतकऱ्यांना हमखास रब्बी उत्पादन घेता येणार आहे. तालुक्यातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून रब्बीच्या पेऱ्यात दुपटीने वाढ करीत रब्बीतून भरघोस उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राहिलेल्या भागात देखील नदी-नाले खोलीकरण व रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात दरवर्षी पर्जन्यमान कमी होत असे. त्यामुळे नेहमी बारामाही पाणी टंचाई, घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण, पाण्याअभावी रब्बी पेर करणे देखील दुरापास्त होते. पंरतु दुष्काळाला कुठेतरी लगाम लागावा तसेच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत झिरपावा यासाठी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी एकञ प्रयत्न सुरू करुन त्या दिशेने वाटचाल सुरू केली. गावातील वर्षानुवर्षे गाळ साचुन असलेले नदी-नाले,पाझर तलावाचे खोलीकरण करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी बांधला. या उपक्रमात सामाजिक संघटना, नाम संस्था, मुंबई येथील ईंडीयन पल्सेस संघटना, केंद्रीय रेल्वे राज्य मंञी रावसाहेब दानवे तसेच आमदार संतोष दानवे यांनी देखील सहभाग नोंदवून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गाळ साचुन असलेल्या नामशेष झालेल्या नदी, नाले, पाझर तलावातील २०१६-२०१७ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करुन जवळजवळ हजारो किलोमीटर नदी-नाल्याचे तसेच प्रकल्पाचे खोलीकरण करुन त्यांचा श्वास मोकळा केला. यंदा तालुक्यातील सर्वच लघू-मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, तळे, धरणे आदी ओव्हरफ्लो झाली आहेत. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असून पाणी टंचाईचा प्रश्न देखील निकाली लागेल. दरम्यान यावर्षी तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण होणार आहे. ेेेजलयुक्तच्या माध्यमातून एक शेती विकासासाठी संजीवनी मिळाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेचा झाला फायदा
आमच्या शेत शिवारात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नदी-नाल्याचे खालीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्याचा फायदा रब्बीत मागील तीन वर्षापासून होऊ लागला आहे. यंदा देखील विहिरीत मुबलक पाणीसाठा जमा झाला असल्याने रब्बीचे उत्पादन हमखास येणार आहे. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बीकडुन अपेक्षा असल्याचे पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी गजानन देशमुख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...