आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहत सोशल ग्रुपतर्फे मागणी २२ वर्षापासून मुस्लिम सामूहिक विवाह आयोजित करण्यात येत आहे. आयशा लॉन्स मुक्तेश्वर तलावासमोर कदीम जालना येथे राहत सोशल ग्रुप जालना तर्फे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा सकाळी १० वा. आयोजीत करण्यात आला. यावेळी मुफ्ती अनिस नाजीम मदरसा अबु हुरेरा वरूडी बदनापूर हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल, विनायक महाराज फुलंब्रीकर, इकबाल पाशा, काँग्रेस आय अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, कदीम जालन्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, अयुब खान, अमेर पाशा, अभय यादव, शेख युसूफ, परमेश्वर गरबडे, शेख रियाज, शाकेर खान, साईनाथ चिन्नदोरे, नसिम चौधरी, अब्दुल करीम बिल्डर, फेरोज बागवान,हाजी शौकत, शेख मोईन, डॉ. सय्यद अख्तर व इतर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मुफ्ती अनिस यांनी सांगीतले की, राहत सोशल ग्रुप जालना मागील २२ वर्षापासून जालन्यात मुस्लीम सामुहिक सोहळ्याच्या मार्फत गरजू ५५० जोडप्यांचे विवाह करण्यात आलेले आहे. जे की सराहनीय आहे. निकाहाची कारवाई काजी सय्यद वहीद, काजी सय्यद नुरोद्दीन, काजी सय्यद अयाज, काजी सय्यद बिलाल यांनी पार पाडली.
जालना शहरात कुस्तीच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल जालना केसरी गोपाल पहेलवान, अब्दुल गफ्फार पहेलवान, शाहु पहेलवान, कमलखान पहेलवान, नंदु पहेलवान खर्डेकर, विलास पहेलवान डोईफोडे, शिवाजी पहेलवान शेळके मामा, गणेश सुपारकर, सय्यद हयातअली पहेलवान, सय्यद अफसरअली पहेलवान, सय्यद अन्वरअली पहेलवान, रामभाऊ सतकर आदींचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी युवानेते अक्षय गोरंट्याल आणि इकबाल पाशा यांची भाषणे झाले.
राहत सोशल गु्रप जालनाच्या पदाधिकाऱ्यांचा परमेश्वर गरबडे, इकबाल पाशा, अमेर पाशा यांनी त्यांच्या कार्याबद्दल सत्कार व सन्मान केला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राहत सोशल ग्रुप जालनाचे पदाधिकारी अध्यक्ष शेख अफसर शेखजी, संस्थापक सचिव लियाकत अलिखान यासेर, सलिम यासिन खान पठाण, शेख सलिम शेख मोहंमद, सय्यद अख्तर, शेख सलिम शेख शकुर, शेर जमाखान, सईद जागीरदार, शेख एजाज, शेख फईम, अहमद जागीरदार, नईम पहेलवान, डॉ. सलिम नवाज हशर जाफ्राबादी, शेख कमर, शेख उसाम, अनस चाऊस, अमजद पठाण, खिजर फारूख, शहबाज पठाण, अंमार यासेर, अजिज पठाण, नईम खान नईम, डॉ. अब्दुल मुक्तदिर अतिक, अजिज चाऊस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन लियाकत अलीखान यासेर आणि डॉ. सलिम नवाज हशर जाफ्राबादी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अब्दुल मुक्तदिर अतिक यांनी मानले. काजी नुरोद्दीन यांच्या दुआने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
२२ वर्षांपासून सहकार्य
कार्यक्रमाची सुरुवात हाफीज सय्यद असरार यांनी कुरान पठण करून केली. प्रस्तावनेत संस्थापक सचिव लियाकत अली खान यासेर म्हणाले की, राहत सोशल ग्रुपला जालनेकरांचे सहकार्य लाभले यामुळेच २२ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सर्व धर्मीयांचा व जनप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. आजपर्यंत ५५० जोडप्यांना विवाहबद्ध करण्यात यशस्वी झालो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.