आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांना जीवदान:सलग 16 दिवसांच्या खंडानंतर पाऊस; 14.40 मिमी नोंद, पिकांना जीवदान

टीम दिव्य मराठी | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग १६ दिवसांच्या खंडानंतर जालना शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी रात्री सरासरी १४.४० मिमी पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी सायंकाळीही जिल्ह्यात पावसाने ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावली. सलग दोन दिवस पडलेल्या या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शुक्रवारी जालना शहरात पावसाची रिमझिम झाली तर भोकरदनसह तालुक्यातील आन्वा, धावडा, पिंपळगाव रेणुकाई, सेलूदमध्ये जोरदार पाऊस पडला. सध्या सोयाबीन फुले व शेंगा अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. तसेच कापूस, मका या पिकांनीही माना टाकल्या होत्या. यामुळे सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, आन्वा येथे सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू झालेला पाऊस तासभर मनसोक्त बरसत होता. यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी आनंदून गेले होते. तसेच सेलूद, पिंपळगाव रेणुकाई शिवारातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

तालुकानिहाय पाऊस (मिमी)
जालना : २३.७०, बदनापूर : २६.२०, भोकरदन ३.९०, जाफराबाद : ११.९०, परतूर १०.७०, मंठा : ९. ५०, अंबड : १६.६०, घनसावंगी : १२.३० अशा प्रकारे शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १४.४० मिमी तर आतापर्यंत एकूण ५५५.९० एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...