आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीर्थपुरीसह परिसरात पाऊस; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

तीर्थपुरीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरात या वर्षी ‘कहीं खुशी कहीं गम’ अशीच पावसाची परिस्थिती असल्याचे दिसून येते. जेथे पडला तेथे पावसात जोर नसल्याने पेरणी लायक पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही भागात पडला तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात खोलवर ओलावा निर्माण झाला नसल्याने बहुतांश ठिकाणी अद्याप पेरणी झाली नाही. ज्यांचे क्षेत्र सिंचनाखाली येते असे तुरळक शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पाणी देऊन कापसाची लागवड केली.

परंतु निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तीर्थपुरी परिसरात कापूस. सोयाबीन. तूर. बाजरी. अशी खरीपाची पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीसाठी एप्रिल - मे मधे शेतातील मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी मान्सूनची प्रतीक्षा करत असतात. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडने, औतपाळी, काडीकचरा वेचणीची कामे उरकून घेतलेली आहेत. तर काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. बहुसंख्य कुटुंबाचा शेती हा प्रमुख उदरनिर्वाचा मार्ग असल्याने कुटुंबातील जे नोकरीनिमित्त शहरात गेलेले आहेत ते कुटुम्बाला हातभार लागावा म्हणून मुंबई. पुणे. औरंगाबाद. येथून सुटी घेऊन गावी येतात. या कालावधीत ते प्रामुख्याने शेतातील मशागतीची कामे पूर्ण करण्यात लक्ष घालतात. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे.

दरम्यान दररोज आभाळ भरून येते आता जोरदार पाऊस पडेल असे वाटत असतानाच थोडा शिडकाव करुन निघून जाते. त्यामुळे तीर्थपुरी परिसरातील मंगरूळ, मुद्रेगाव, भोगगाव, सौंदलगव, बानेगाव, शेवता, मुरमा, रामसगाव, जोगलादेवी, दैठना, एकलहेरा, भायगव्हाण, राहेरा, भणंग जळगाव, खा. हिवरा, खालापुरी, कंडारी, एकरुखा आदी भागातिल शेतकरी मोठ्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...