आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गहू आडवा:धावडा परिसरात पाऊस; ओंब्यांतील गहू आडवा

धावडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरातील विविध गावांमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. यात गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आेंब्यात आलेला गहू झोपला आहे.

भोकरदन तालुक्यातील धावडा, मेहगाव, पोखरी, विझोरा, वाढोणा, भोरखेडा परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस पडला. मात्र डोंगरभागकडील मेहगाव येथे पावसाचे प्रमाण व त्यात बारीक तुरळक गारी तसेच पावसासह वारा जास्त असल्याने मेहगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी पिक अडवे पडले.

खरीपातील नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही. तिच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना रब्बीच्याही पिकावर संकट कोसळले आहे. शासनाने या झालेल्या नुकसानीची पाहणी करूण नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...