आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:चमनचा राजा गणेश मंडळ देखाव्यांतून जपतेय धार्मिक परंपरा

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्याच्या माध्यमातून चमनाचा राजा गणेश मंडळ धार्मिक परंपरा जपण्याचे त्याचबरोबर समाजप्रबोधनाचे काम करत आहे, असे गौरवोद्गार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी काढले.

रविवार, २१ ऑगस्ट रोजी चमनचा राजा गणेश मंडळाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जालना बाजार समितीचे उपसभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अंबेकर बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती होती. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष नंदू जावळे, सचिव अशोक पडूळ, उपाध्यक्ष रामा खांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. भास्कर दानवे म्हणाले की, या आधुनिकतेच्या युगातही गणेशोत्सवात सादर केलेले देखावे भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम करत आहे. चमनचा राजा गणेश मंडळ दरवर्षी पौराणिक आणि धार्मिक देखाव्यातून आपले वेगळेपण जपत आहे. अक्षय गोरंट्याल म्हणाले की, देखाव्यासोबतच गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचे काम या मंडळाकडून होते आहे.

याप्रसंगी राजेंद्र राख, शरद देशमुख, भाऊसाहेब घुगे, राजेंद्र गोरे, अरविंद देशमुख, डॉ. अरविंद म्हस्के, किरण गरड, अशोक उबाळे, सुभाष कोळकर, चंद्रशेखर वाळिंबे, सुरेश मुळे, दशरथ तोंडुळे, सिद्धिविनायक मुळे, भय्या गाढे, कॉ. सगीर अहमद, योगेश पाटील, कपिल दहेकर, धनराज काबलिये भागवत बावणे, अनुप आबड, संजय देठे, अजिंक्य घोगरे, घनश्याम खाकीवाले, मंडळाचे प्रशांत म्हसके, मंगेश देशमुख, दादा गाढे, मंगेश चव्हाण, विक्रम आगटे, दीपक आगलावे, अमर जाधव, विक्रम आगलावे, निरंजन राख, गजानन नागरे, योगेश खरात, आनंद कुंडलीकर, कैलास जैस्वाल,छोटुलाल पिछाडे, विनय देशमुख, अतुल ढवळे, गजानन चव्हाण, जयप्रकाश देशमुख, सोनाजी नन्नवरे, नितीन इंगळे अादींसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...