आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती पोंभूर्णा, आयएसओ राज्य ग्रामपंचायत,घाटकुळ आयोजित राजे हिरशाहा आत्राम राज्य वाडमय पुरस्कार जालना येथील कवी तथा कथाकार डॉ. प्रभाकर शेळके यांच्या व्यवस्थेचा बईल या कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. “आपली साहित्य कलाकृती समकालीन समाजाला दिशा देणारी व घडविणारी आहे” संयोजक राज्य वाड्मय स्पर्धा कवी अविनाश पोईनकर, सदस्य विनोद देशमुख, सरपंच सुप्रिम गद्देकार, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, सभापती अल्काताई आत्राम यांनी डॉ. शेळके यांची निवड केली. आदर्श शिक्षक बाबासाहेब माकोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल डॉ. शेळके यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, संस्थेच्या सचिव मनिषा टोपे, डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ.शहाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. गजहंस, प्रा.बसवराज कोरे, प्रा.पंढरीनाथ सारके, प्रा.पांडूरंग खोजे, लिलाबाई माकोडे, सुनीता शेळके, डॉ.सुहास सदाव्रर्ते, विनोद जेतमहल, संजीवनी तडेगावकर, कैलास भाले, सुनील लोणकर, डॉ. धोंडोपंत मानवतकर, नामदेव शेळके, कल्याण नरवडे, दिलीपराव मुळे, विठ्ठल घोडके, अप्पासाहेब नाटकर, डॉ.राज रंणधीर, डॉ. एकनाथ शिंदे, परेश पवार, भगवान टेपले, महेश कुलकर्णी, शेख बाशन, शफिक सय्यद, तुकाराम पवार यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.