आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:स्पर्धेत चमकलेल्या खेळाडुमचा राजेश टोपे यांच्याकडून गौरव

बदनापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील टि्वकल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लखनऊ येथे झालेल्या पहिल्या हँड टू हँड फायटिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्याला दुसरा क्रमांक मिळवून दिला. लखनऊहून त्यांचे जालन्यात आगमन होताच पालकमंत्री राजेश टोपे यांनी खेळाडू, मुख्याध्यापिका व प्रशिक्षिका यांचा गौरव केला.

निर्मल क्रीडा व समाजप्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शाळेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. मागील आठवड्यात उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे हँड टू हँड फायटिंग ही पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका निशिगंधा देशमुख व प्रशिक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्कूलचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त कामगिरी बजावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेत विशाल बेवले या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावले, तर तोहित पठाण, करत सावंत, प्रथमेश मुंडलिक या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली. अमोल तांबे, पवन मुलक, फैजान खान या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावत महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळवून दिला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...