आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परतुरात मोर्चा‎

परतूर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी‎ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस, कापूस,‎ सोयाबीन, पिकविमा, अतिवृष्टी अनुदान,‎ धरणग्रस्त, रस्ते प्रकल्पग्रस्तांची परतूर येथील‎ मार्केट कमिटीच्या मैदानावर १४ मार्च सकाळी‎ ११ वाजता शेतकरी परिषद आयोजित केली‎ आहे.‎ या वेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.‎ डॉ.जालंधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी‎ संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप,‎ उच्चाधिकार समिती प्रमुख प्रा. प्रकाश‎ पोकळे, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी‎ महाराज भोसले, माजी राज्यमंत्री रविकांत‎ तुपकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.‎

यात श्रद्धा एनर्जी ॲण्ड इंफ्रा प्रो. प्रा. लि. माँ.‎ बागेश्वरी कारखान्याने ऊस नोंदीसाठी‎ घेतलेले एकरी दहा हजार रूपये विनाअट‎ परत करावे, एक रकमी एफ.आर.पी द्यावी,‎ जळीत उसाची कपात केलेली रक्कम‎ शेतकऱ्यांना परत करावी, नोंद झालेला ऊस‎ १२ महिन्यांच्या आत कारखान्याने घेऊन‎ जावा, कापूस पिकास प्रती क्विंटल १२ हजार‎ तर सोयाबीनला ७ हजार रूपये हमीभाव‎ देण्यात यावा, एच.डी.एफ सी पिक विमा‎ कंपनीने पिक विम्याची रक्कम तात्काळ‎ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी,‎ अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या‎ खात्यावर वर्ग करण्यात यावे, निम्म दुधना‎ प्रकल्पातील अतिरिक्त जमिनीचे संपादन‎ तात्काळ करण्यात यावे परतूर तालुक्यातील‎ पाण्यापासून वंचितदुष्काळी भागाला पैठण‎ डाव्या कालव्यातून सेलू ते लिंबोनी पाडळी‎ येथून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी‎ देण्यात यावे आदी मागण्यांसाठी ही परिषद‎ होत आहे. या परिषदेस उपस्थित राहण्याचे‎ आवाहन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी,‎ जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, परतूर तालुकाध्यक्ष‎ गणेश राजबिंडे आदींनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...