आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण साजरा:स्काऊट गाइडतर्फे शासकीय कार्यालयात रक्षाबंधन साजरे

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काऊट आणि गाइड जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलिस मुख्यालय, कदीम पोलिस ठाणे व नगरपरिषद कार्यालय येथे रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.नगरपरिषद कार्यालयातील स्वच्छतेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या घंटागाडी चालकांना स्नेहा साने, ऋतुजा कसबे यांनी राख्या बांधून औक्षण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. बानापुरे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, योगेश वाघ यांना राख्या बांधून औक्षण करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलिस निरीक्षक संजय व्यास व इतरांना राख्या बांधल्या. कदीम जालना पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक मजहर सय्यद, पदधने, मनोज हिवाळे, प्रदीप कदम तसेच जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर यांना राख्या बांधून औक्षण केले. कार्यक्रमासाठी जिल्हा संघटक स्काऊट के. एल. पवार, सोनिया शिरसाठ, व्ही. बी. गायकवाड, स्काऊट मास्टर रमेश भागवत, लेडी कब मास्टर शारदा सद्गुरे, रमेश वारे, साईनाथ ठाकूरवार, नंदू आडे यांनी परिश्रम घेतले. रक्षाबंधन कार्यक्रमात ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल जालना व स्वामी विवेकानंद हायस्कूल जालना या शाळेतील ४० ते ५० गाईडनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...