आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:राममूर्ती जि. प. शाळेची दुरवस्था

सिंधीकाळेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील राममूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे. तसेच या ठिकानी राहत असलेले ग्रामस्थ शौचालयासाठी या शाळेच्या परिसराचा वापर करीत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे.

राममूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसते. वर्गाच्या समोरच बऱ्याचदा विष्ठा आढळते. शाळेच्या आवारातून लोक शौचास जातात व त्यामुळे संपूर्ण वर्गामध्ये दुर्गंधी पसरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे आठवीपर्यंत वर्ग असताना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ चारच शिक्षक कार्यरत आहेत. तसेच पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही. उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापकच शाळेचा कारभार पाहतात. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रामकिसन मुळे, कैलास राऊत, प्रेमानंद मगरे, संदिप मगर, अजीस घोचिवाले, बंडू केळकर, विलास मगर, शिवाजी मगर, योगेश शिमगे, विष्णू मगर, दत्ता खरात, शंकर मगर, सिध्दार्थ मगर, मोहन मगर, गौतम मगर, रावसाहेब गिराम, गणेश चौधरी आदी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...