आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अंबड येथील रणवीर खरात याचा शाळेतर्फे सत्कार

अंबड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातील स्केटिंग स्पर्धेत ऋषीविद्या इंग्लिश स्कूल जालना या शाळेचा विद्यार्थी रणवीर रविंद्र खरात (अंबड ) याने प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याची विभागीय स्तरावर निवड झाली.

या यशाबद्दल सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळेतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खरात, उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप खरात, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, नितीन निचळ मुख्याध्यापक मनोहर पटेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...