आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंना कोरोना:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लक्षणांसह कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचे केले आवाहन

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून राजकीय मंडळींना देखील कोरोना होण्याचे सत्र सुरुच आहे. राज्यात 10 मंत्री आणि 70 आमदारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता एका केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की, "रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रावसाहेब दानवे हे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. कार्यकर्त्यांनी यांची नोंद घ्यावी," असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे. तसेच, संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे देखील ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात राजकीय मंडळींना कोरोना होण्याचे सत्र जोरात सुरू आहे. महाराष्ट्रातील जवळपास 70 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...