आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाची मागणी:न्याय व्यवस्थेसह सर्व क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर मागासवर्गीय घटकांना जाचक असलेली नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करून न्याय व्यवस्थेसह केंद्रीय सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये पूर्ण आरक्षण लागू करावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश चितळकर यांनी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना रासपच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले, इतर मागासवर्गीय घटकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या साठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर हे नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ५ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असून या पार्श्वभूमीवर जातिनिहाय जनगणना करावी, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, पन्नास टक्के सिलिंग हटवावी, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलून हमीभावाने धान्य खरेदी ची हमी, शिक्षण व आरोग्य सेवा मोफत द्यावी अशा मागण्यांचा समावेश आहे. यावेळी ओमप्रकाश चितळकर, अॅड. श्रीराम हुसे, विनोद मावकर, अॅड. सिध्देश्वर खरात, गोविंद मदनुरे, कारभारी अंभोरे यांच्यासह रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...