आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:रस्त्यासाठी दाभाडीत रास्ता रोको आंदोलन

दाभाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी विभागात नादुरस्त रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडी व इतर सर्वपक्षीयांतर्फे दाभाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.किन्होळा, खामगाव फाटा, दाभाडी, चिखली ते विल्हाडी या रस्त्यासह दाभाडीला जोडणारे नादूरस्त रस्त्याचे काम त्वरित चालू करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता एस. क्यू. कादरी, जालना जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता राजहंस यांना देण्यात आले.

यावेळी भारतीय दलित पॅन्थरचे संयोजक शिवाजी आदमाने, अंबादास रगडे, विशाल पडोळ, अप्पा म्हसलेकर, काँग्रेसचे कैलास गडवे, जयसिंग राजपूत, जुबेर पठाण, शमीम मिर्झा, सलिम कुरैशी, सगिर सिध्दीकी, दिपक कायंदे, सुभाष भुजंग, जुल्फेकार बागवान, नारायण जैवाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...