आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अंबड तालुका अध्यक्षपदी रवींंद्र खरात

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजधर्म शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रणवीर फिटनेस झोनचे संचालक रवींद्र साहेबराव खरात यांची अंबड तालुका बॉडी बिल्डिंगच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष मनीष नंद यांनी केली आहे.

रवींद्र खरात म्हणाले, बॉडी बिल्डिंग टॅलेंट तयार करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल आणि त्यांना उच्च स्तरावर नेण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करेल. या निवडीबदल अंबड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, मनोहर पटेकर, नितीन निचळ, वाल्मिक निंबाळकर, आसाराम भद्रे, विठ्ठल खरात, भागवत खरात, मुरली सहारे, विलास जाधव, प्रशिक खंडारे, तौफिक शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...