आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरनिवड:भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पाबळे यांची फेरनिवड

भोकरदन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील त्र्यंबकराव बंडू पाबळे यांची भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिाकार्जुन खर्गे, प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी ही निवड केली आहे.

या निवडीचे आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, माजी नगरसेवक संतोष अन्नदाते, सोपान सपकाळ यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...