आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांत संभ्रम:अतिवृष्टीच्या अनुदानासाठी पुन्हा कागदपत्रांची जुळवाजुळव

तळणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तळणी मंडळात खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी मदत अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. तुटपुंज्या मिळणाऱ्या मदतीसाठी एवढी प्रतीक्षा का, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकेत चकरा मारून बँक कर्मचाऱ्यांनी अनुदानाची रक्कम जमा झाली का याची शहानिशा करण्याचा सपाटा लावला. तर दुसरीकडे महसूल मंडळाच्या सावळ्या गोधळामुळे अनुदान प्राप्त नसतानाही याद्या प्रसिद्ध केल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मिळणारे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आता शेतकऱ्यांना परत कागदाची जुळवा जुळव करावी लागणार आहे. आधार कार्ड व बँक पासबूकची झेराक्स प्रत बँकेत जमा करावी लागणार आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असतानाही परत त्याची मागणी का होत आहे. संपूर्ण जिल्हाला चारशे कोटीची मदत मिळाली खरी पण अद्यापपर्यन्त ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. शासनाचे उदासीन धोरण हे शेतकऱ्याचे मरण होत असून सरळ खात्यात रक्कम लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. मदत मिळणार म्हणून काही शेतकऱ्यांनी थोडीफार झालेली सोयाबीनची विक्री थांबवली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीचे अनुदान अजुनपर्यन्त प्राप्त झाले नाही. तसेच शेतकऱ्यांच्या कागदपत्रासंदर्भातला निर्णय हा शासनाचा असल्याचे तहसीलदार कैलास वाघमारे यांनी सांगितले. तर दोन तीन महिन्यापासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध असतानाही ती परत का मागवत आहेत. कुठल्याही अटी शर्थी विना शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. असे शेतकरी प्रभूसिंह चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, मागील चार पाच वर्षपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाची मालिकाच सुरु आहे.

अनुदानाबाबत बँकेला शासनाचे कुठलेच पत्र नाही
शेतकऱ्यांच्या बँक खात्याची व आधार कार्डची झेराक्स घेण्यासंदर्भात शासनाचे कुठलेच पञ बॅकेला नाही तसेच अतिवृष्टीचे अनुदानाच्या याद्या बँकेला अजून प्राप्त नाही अनुदानाच्या याद्यामुळे बॅक कर्मचाऱ्यांना नाहकचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तळणी शाखा व्यवस्थापक राजेद्रकुमार म्हस्के यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...