आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:वरफळ ग्रामपंचायतीसाठी विक्रमी 85 % मतदान

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वरफळ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. गावातील ९५ वर्षीय वयोवृध्द महिला मतदार कचराबाई लालझरे यांनी मदतनीसाच्या मदतीने मतदान केले. निवडणूक आयोगाच्या वतीने वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी आणि मतदान करतांना कुठलीही अडचण येऊन नये म्हणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

वरफळ येथे एकूण चार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडे सात ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान चारही केंद्रांवर सरासरी ११ टक्के मतदान झाले होते. दहा वाजेनंतर मतदानाचा टक्केवारीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी साडे पाच पर्यंत विक्रमी ८५ टक्के मतदानाची नोंद वरफळ येथे करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

बातम्या आणखी आहेत...