आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी करता येणार:आजपासून पीक कर्ज मागणीसाठी नवीन सॉफ्टवेअरवर नोंदणी अर्जाला सुरुवात

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीककर्ज मागणी नोंदणीसाठी करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यासाठी jalna.cropsloan.com ही लिंक देण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमध्ये १४ जूनपासून नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांनी संबंधित संबंधित बँक शाखेस आवश्यक कागदपत्रांसह भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. चालु खरीप हंगामासाठी बँकांमार्फत पीककर्ज वाटप सुरू असून यासाठी गुगल लिंकवर अर्ज भरून पीक कर्ज मागणी करता येत होती. १० जूनपर्यंत यावर १५ हजार ४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून अग्रणी बँकेमार्फत ही यादी संबंधित बँकांना पाठवण्यात आली आहे. यामुळे सदरील शेतकऱ्यांनी नवीन सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, असेही डॉ. राठोड यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...