आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महिनाभरापूर्वी कोकाटे हदगाव तांडा (ता. परतूर जि.जालना) येथून ऊसतोड मुकादम अंकुश भाऊराव राठोड (४५, रा.केसापुरी ता. माजलगाव) बेपत्ता झाले होते. आता त्यांचा नातेवाइकांनीच खून केल्याचे उघड झाले आहे.
खून केल्यानंतर मृतदेह व त्यांची दुचाकी पिकअपमध्ये टाकत गंगा सावंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात अंकुश यांचा साडू एकनाथ चव्हाण, महादेव रूपचंद चव्हाण व त्याच्या पत्नीला अटक झाली. खुनामागे अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराची किनार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. बुधवारी नदी पात्रात दुचाकी (एमएच २३ एसी ९२७४) सापडली. मृतदेहाचा शोध सुरू आहे.
अंकुश हे १ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाले होते. त्याच दिवशी एकनाथने महादेव व त्याची पत्नी यांच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली.
एसपी, एएसपींचा दररोज फॉलोअप
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यातून पथक तयार केले होते. यात पथक प्रमुख म्हणून पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, आर. डी. रंगे, एम. बी. स्कॉट, राजू पवार, आडेप यांचा समावेश करण्यात आला होता. या पथकाकडून एसपी देशमुख दिवसातून दररोज काय तपासाबाबत आढावा घेत होते.
मृतदेह सापडण्याची शक्यता कमी
या खुनाला महिना उलटल्यामुळे मृतदेह पाण्यात सापडण्याची शक्यता कमी आहे. कदाचित आता सांगाडाच सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, दुचाकी पाण्याबाहेर काढण्यासाठी या परिसरातील मच्छीमारांची मदत घेण्यात आली.
फायर ब्रिगेड दोन दिवस तळ ठोकून
पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेंकर यांना तपासासाठी फायर ब्रिगेड व एक बोट लागत असल्याचे सांगताच त्यांनी तत्काळ बोट दिली. आरोपींनी कबुली दिल्यानंतर मृतदेह व दुचाकी पाण्याबाहेर काढण्यासाठी बुधवारी व गुरुवारी दिवस तळ ठोकून होते. बुधवारी दुचाकी काढली. तर, गुरुवारी मृतदेह सापडला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.