आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण:नेत्र तपासणी शिबिरात 201 रुग्णांना दिलासा

बदनापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट न्यू लाईफ केअर हॉस्पिटल बदनापूर व लायन्स नेत्र रुग्णालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने देवपिंपळगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर २ डिसेंबर रोजी घेण्यात आले. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, २०५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ,तात्काळ चष्म्याचे नंबर कढून देण्यात आले. २४ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने बदनापूर तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात घेण्याचा निर्णय घेतला व संस्थेचे न्यू लाईफ केअर हॉस्पिटल बदनापूर व लायन्स नेत्र रुग्णालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापूर तालुक्यात गावागावात नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रीया, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यास प्रारंभ केला.

या शिबीरांना ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २ डिसेंबरला देवपिंपळगाव येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात २०५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असता २४ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...