आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान पीक विमा योजनेला भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. रब्बी हंगामात शेलूद परिसरात आतापर्यंत केवळ १५० शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनेत अर्ज स्वीकारणे काही दिवसांपासून सुरू आहे. तालुक्यात पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्या सक्रिय पणे काम करीत आहे. परंतु शेतकऱ्यांकडुन भोकरदन तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बागायती गहू व हरभरा ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. पिकांची जोखीमस्तर ७० टक्के आहे.
ही योजना इच्छुक स्वरुपाची असून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी १५ डिसेंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम मुदत केवळ एक दिवसांवर आली असतानाही रब्बी हंगामात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे पाहावयास मिळत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक हानीची नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून केली जाते यासाठी शेतकऱ्यांना हा विमा घेणे आवश्यक आहे. हरभरा पिकासाठी हेक्टरी ४३२ ( शेतकरी हिस्सा ) एवढा आहे.
केंद्र व राज्य हिस्सा प्रत्येकी ५०४ रुपये असणार आहे तर गहू बागायतीसाठी हेक्टरी ६३० ( शेतकरी हिस्सा ) रुपये आहे . तर केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ७३५ रुपये हिस्सा असणार आहे. रब्बी हंगामात अधिक हेक्टरवर हरबरा व गव्हाची पेरणी झाली आहे
निकषानुसार भरपाई
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसगत केली जात नाही. निकषानुसार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई दिली जाते. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. रब्बी हंगामात तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन पिकांना विमा सुरक्षा द्यावी जेणेकरून नुकसान झालेल्या पिकांना सुरक्षा कवच मिळेल. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.