आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मुथा बिल्डिंग परिसरातील अतिक्रमण हटवा; निवेदन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराच्या मध्यभागात मुथा बिल्डिंग परिसरात नगरपालिकेची नाली बंद करून बेकायदेशीर अतिक्रमण करून रस्त्यालगत कपडा बाजार सुरू केल्याने या अतिक्रमणामुळे वाहतूक ठप्प होत आहे. या वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोठे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात वाहनाने येणे-जाणे अवघड झाले आहे. पोलिसांनी दखल घ्यावी.

या बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या कपडा बजार मुळे वाहतूक जाम होुन दररोज अपघात होत आहे. स्वच्छता निरीक्षकांनी अतिक्रमण हटविले की, दुसऱ्या दिवशी अतिक्रमण करुन यामुळे या संगीत खेळ अतिक्रमण धारक, स्वच्छता निरीक्षक व नगर पालिकेचे आदेशाला जुमानत नाही. याबाबत अनेक वेळा तक्रार अर्ज मुख्याधिकारी नगर परिषद जालना व जिल्हाधिकारी जालना यांना देण्यात आले असून अतिक्रमण करणारे यांच्या विरुधद गुन्हा दाखल करुन त्यांचे कपडा साहित्य जप्त करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या निवेदनावर पारस नंद यादव, अविनाश पाटील, धनसिंह सुर्यवंशी, सचिन क्षिरसागर, विक्की हिवाळे, अर्जुन गौरक्षक, राजेश कांबळे, अशोक घोडे, सय्यद महेमुद, विजय खताडे, गणेश अग्रवाल, राजेश गुघे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...