आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय योजना:सौरऊर्जेसाठी आपली पडीक शेती भाड्याने द्या अन् मिळवा 30 हजार

पिंपळगाव रेणुकाई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांची पडीक जमीन वाया जाणार नाही. कारण तुम्ही सौरऊर्जेसाठी शेती भाड्याने देऊन वार्षिक ३० हजार रुपये कमावू शकता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत सौर कृषिपंप बसविला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना करार पद्धतीने शेतजमीन द्यावी लागणार आहे. त्याचा मोबदलाही मिळणार आहे. महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरात शेतजमिनीवर सोलर प्लेट उभारून दरदिवशी दोन मेगावॅट निर्मितीचा हा प्रकल्प आहे. ही वीज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यातून गावोगावी वीज पुरवठा होईल. यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेसंदर्भात भोकरदन तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ आहे. या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने लाभ घेतलेला नाही. या योजनेसाठी शेती रस्त्याला लागून असणे आणि उपकेंद्र त्या ठिकाणापासून जवळ असणे गरजेचे आहे.

या प्रमुख अटीमुळे अनेकांना सहभाग नोंदविता आला नाही. किमान तीन एकरापासून ५० एकरापर्यंत आपली पडीक जमीन सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी तीन एकरापासून ते ५० एकरांपर्यंत भाडेतत्त्वावर देता येईल, अशी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना तयार केलेली आहे. जमीन देणारे खासगी व्यक्ती अथवा संस्थांना वार्षिक भाडे देणार आहे.

लाभ घ्यावयाचा असेल तर संकेतस्थळावर नोंदणी करावी ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा भाडेतत्त्वावर जमीन देऊन लाभ घ्यायचा, असेल तर अशा शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर त्यांची स्थळ पाहणी करण्यात येऊन पुढील कार्यवाही केली जाते. महावितरण याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत असल्याचे पिंपळगाव रेणुकाई उपकेंद्रातील शाखा अभियंता प्रदीप गावंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना योजना लाभदायी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे. याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शिवाय महावितरणने देखील जनजागृती करावी. यासह अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. -संतोष दानवे, आमदार, भोकरदन

बातम्या आणखी आहेत...