आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शेतशिवारात तुटलेल्या विद्युत पोलची दुरुस्ती करावी; शेतकऱ्यांतून मागणी

गुंज बुद्रुक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, गुंज बुद्रुक परिसरात अनेक गावच्या शेतशिवारात विद्युत खांब तुटलेल्या अवस्थेत असून ताराही लोंबकळलेल्या आहेत. याकडे लक्ष देऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोल दुरुस्त करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. घनसावंगी येथील १३२ सबस्टेशनहून कुंभार पिंपळगाव येथील महावितरण उपकेंद्राकडून परिसरातील जांबसमर्थ, भेंडाळा, विरेगव्हाण, लिंबी, मुर्ती, श्रीपत धामणगाव, घाणेगाव, कोठाळा आदी गावांतील शेतशिवारातून वीजवाहिनी गेलेली आहे. अनेक शेतशिवारातील वीजेचे खांब तुटलेले व वाकलेल्या अवस्थेत आहेत. शेतातील विद्युत खांब हे पूर्ण वाकलेले असून तारा जीर्ण होऊन लोंबकळलेल्या आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करताना अडचणी येत आहेत. लोंबकळलेल्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊन पीके वाया जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत आहे. दरम्यान,मागील दोन महिन्यांपूर्वी श्रीपत धामणगाव(ता.घनसावंगी) येथील चारी नंबर ३४ वरील एका ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ने विद्युत खांबला धडक दिल्याने पाच पोल पडले होते. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती येथील महावितरणाला कळविली. परंतु महावितरण अधिकाऱ्यांकडून संबंधित ट्रॅक्टर चालकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

सदरील हे काम दुरूस्ती करण्याकडे महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने महावितरणाविरोधात शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पडलेल्या विद्युत खांबाची तात्काळ दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी शेतकरी मुरलीधर शिंदे, अरूण शिंदे, गोविंद शिंदे, संतोष शिंदे, ठकाजी शिंदे, अविनाश शिंदे, सर्जेराव शिंदे, वैजिनाथ शिंदे, अंकुश इंदे, भारत राऊत, शरद फाटकुरे, नानासाहेब शिंदे, बापुराव शिंदे, आसाराम शिंदे, सुनील शिंदे, अंकुश राऊत, गणेश राऊत, शाम शिंदे, दिलीप शिंदे, लक्ष्मण वाहुळे, भागवत शिंदे यांच्यासह आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...