आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सुरक्षिततेसाठी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा; महाराष्ट्रदिनी पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोविड अनुषंगिक वर्तणुकीचे पालन करण्याबरोबरच कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उप विभागीय अधिकारी संदिपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा शल्य‍चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, प्रशांत पडघन आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गत दोन वर्षांत कोरोना महामारीच्या काळात संघर्ष करत या महामारीतून मुक्त होण्यासाठी सर्वांनी मोठा लढा दिला. आजघडीला कमी झालेला कोरोनाचा आलेख काही प्रमाणात वाढत असल्याने या संकटातुन मुक्त होऊन सर्वांना सुरक्षित रहाण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस प्रत्येकाने टोचून घेणे गरजेचे आहे. १२ ते १५ तसेच १५ ते १७ आणि १८ वर्षांवरील प्रत्येक लाभार्थींनी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस टोचून घ्यावी. ६ ते १२ वयोगटातील लाभार्थींना लस देण्याची मुभा भारत सरकारने दिली असून प्रत्येक पालकाने आपल्या पात्र पाल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता टोचून घेत या संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी प्राधान्याने लस टोचून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...