आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपणाची सुरुवात:पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण काळाची गरज; पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांचे प्रतिपादन

तीर्थपुरी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हा महत्त्वाचा भाग असल्याने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले. मंगळवारी तीर्थपुरी येथे बल्लाळ यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. बल्लाळ यांनी गेल्या वर्षी चालू केलेला वृक्षारोपण उपक्रमांतर्गत यावर्षी वृक्षारोपणाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेतून आदर्श कॉलनीत “वृक्षारोपण व संवर्धन” हा उपक्रम पार पडला.

यावेळी जगन्नाथ वाजे, मधुकर गटकळ, विष्णू वाजे, सोमनाथ सवणे, जम्मू शेख, समद शेख, विष्णू राऊत, नारायण एसलोटे, माऊली जाधव, परमेश्वर बिल्लोरे, नवनाथ वाजे, अमोल राऊत, जगन्नाथ घाडगे, आदर्श फाउंडेशनचे विलास एसलोटे, आदित्य बोबडे, अशोक घाडगे, संभाजी गटकळ, उमेश गटकळ, योगेश मुळे, बद्रीनाथ फरकासे, ईश्वर जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...