आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 गणांसाठी गुरुवारी आरक्षण:अंबड तालुक्यात 18 गणांचे आरक्षण जाहीर

अंबड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समितीच्या १८ गणांसाठी गुरुवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गण अनुसूचित जाती महिले साठी तर गोंदी गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे.

तालुक्यातील पूर्वी १६ पंचायत समिती गण होते. त्यात रुई आणि लोणार भायगाव या दोन नवीन गणांची भर पडल्याने आता तालुक्यात एकूण १८ गण झाले आहेत. १८ पैकी ९ गण महिलांसाठी आरक्षित असून त्यात रुई, वडीगोद्री, घुंगर्डे हादगाव, शहागड, पारनेर व सोनक पिंपळगाव हे ६ गण सर्वसाधारण महिलांसाठी तर हस्तपोखरी व ताड हादगाव हे २ गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

तालुक्यातील चिंचखेड, जामखेड, दुनगाव, लोणार भायगाव, धाकलगाव, महाकाळा हे ६ गण सर्वसाधारणसाठी तर दहीपुरी व रोहिलागड हे २ गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झाले आहेत. गत निवडणुकीत पंचायत समितीच्या १६ गणांपैकी धाकलगाव, वडीगोद्री, महाकाळा, दुनगाव, साष्ट पिंपळगाव, गोंदी, घु.हादगाव, शहागड, दहीपुरी, ताडहादगाव या गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर पारनेर, हस्तपोखरी, रोहिलागड, चिंचखेड, जामखेड व सोनक पिंपळगाव या ६ गणातून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.

जाफराबाद तालुका
पंचायत समितीच्या १२ गणांमध्ये भारज बुद्रुक सर्वसाधारण महिला, वरुड बुद्रुक सार्वसाधरण, खासगाव सर्वसाधारण महिला, माहोरा सर्वसाधारण, जवखेडा ठेंग सर्वसाधारण महिला, चिंचखेडा मागासवर्गिय महिला, सिपोरा अंभोरा इतर मागासवर्गीय महिला, सावरगाव म्हस्के सर्वसाधारण महिला, आंबेगाव इतर मागासवर्गीय सर्वसाधारण, टेंभुर्णी सर्वसाधारण, अकोला देव मागासवर्गीय, देवळेगव्हाण सर्वसाधारण या प्रमाणे आरक्षणाची सोडत करण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...