आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण जाहीर:सेलू नगरपालिकेच्या 26 जागांचे आरक्षण जाहीर; अनु.जातीकरिता 4 तर अनु.जमातीस 1 जागा

सेलू21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या श्री. साई नाट्यगृहात पीठासीन अधिकारी तथा निवासी जिल्ह्यधिकारी महेश वडदकर यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. यावेळी २६ सदस्य संख्यापैकी ३ जागा अनुसूचित जाती आणि १ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

या वेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव, उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड लेखापाल राठोड, धनंजय बायस आदीची उपस्थिती होती. इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी सोहम सचिन कोरडे यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. सेलू नगर पालिकेची सदस्य संख्या २४ वरून २६ करण्यात आली आहे. २६ पैकी १३ जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात अनुसूचित जातीच्या महिलासाठी प्रभाग क्रमांक १३ आणि प्रभाग क्रमांक ५ अ या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे २६ पैकी तब्बल २२ जागा सर्वसाधारण झाल्या आहेत. प्रभाग रचना अंतीम करताना अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक १३ मधील एक जागा आरक्षित करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ४ मधील एक जागा आरक्षित करण्यात आली. तर प्रभाग क्रमांक १३ मधील जागा अनुसूचित जमाती ऐवजी राखीव ठेवले.

बातम्या आणखी आहेत...