आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व (अश्व) ॲक्शन फॉर सोशल हेल्थ इज वेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड पंचायत समिती कार्यालयात ‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी तालुक्यातील ३५ गावांचे सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन करत बालविवाहमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला.
या वेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक एम. डी. सरोदे यांनी सरपंच, ग्रामसेवकांशी संवाद साधला. बालविवाह ही समाजाला लागलेली कीड असून ती आपण दूर केली पाहिजे. मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करत बालविवाहाचे दुष्परिणामही समजावून सांगितले.
आमचा गाव आमचा विकास योजनेमधील बालस्नेही गाव यावरही मंथन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर अंबड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. ए. चव्हाण, एस. के. खिल्लारे, व्ही. बी. बनाटे, आरोग्य विस्तार अधिकारी पी. जी. वैष्णव, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी जाधव यांनीही कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.
मुलांसोबत होणारे हिंसाचार रोखण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करा सर्व मुले त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे अस्तित्व, सहभाग आणि संरक्षण या हक्काचा आनंद घेऊ शकतील याची खात्री करणे हा बालस्नेही उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यात निरोगी मुले, १०० टक्के मुलांची शाळेत नोंदणी, बालविवाहांना प्रतिबंध करणे, तस्करीच्या प्रकरणांना आळा घालणे, १०० टक्के बालमजूरमुक्त गाव, मुलांसोबत होणारे सर्व प्रकारचे हिंसाचार रोखण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.