आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जाफराबाद तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच तालुका वसुंधरेने नटण्यासाठी तालुक्यातील शंभर गावासाठी ग्रामसेवक, सरपंच तसेच लोकसहभागातुन हरित टेकडी, घनदाट वृक्ष लागवड, वृक्षारोपन, स्मशानभुमीसह अन्य ठिकाणी सुमारे तीन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प ग्रामसेवक संघटनेने केला असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव पिंपळे यांनी सांगितले.
अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त स्वांतत्र्य दिन साजरा करीत असतांना जिल्हाधिकारी डॅा.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, गटविकास अधिकारी विष्णु बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे.जाफराबाद तालुका हरीत करण्यासाठी तालुक्यात विविध गांव परिसरात असलेल्या टेकड्यांवर, मोकळया जागेत, शेत बांधावर, शाळा, अंगणवाडी, विविध शासकीय इमारती परिसर, स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपन करुन सुशोभिकरण करण्यात येत आहे. तालुक्यातील भारज जंगलातील गजानन महाराज मंदीराच्या टेकडीवर वृक्षा रोपन केले तर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी विविध जातीच्या वृक्षाची लागवड केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय इंगळे, तहसिलदार स्वरुप कंकाळ, शरद गव्हाणे, राजेश सोनवणे, विस्तार अधिकारी एन. टी. खिल्लारे, गजानन लहाने, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव पिंपळे, राजेंद्र परिहार, आर. एम. कंकाळ, व्ही. पी.बाहेकर, एस. डी. पाटील, लक्ष्मण धुमाळ, व्ही. टी. जायभाये, जगदीश आढाव, एस. डी. पाटील, एस. डी. लहाने, भरत दांडगे, वाय. बी. देशमाने, एस. एस. बंगाळे, सुनिल लोखंडे, एम. आर. डोईफोडे, सी. आय. पठाण, सुरेंद्र भंडारे, एस. ई. सोनुने, डि. के. मेहेत्रे, आर. बी. दांडगे, पी. पी. पडघन, ए. ए. डोईफोडे, आर. डी. तेजनकर, एन. एन. चौधरी, एस. के. पडघन, आर. बी. जाधव, शेख अल्ताफ, डी. एस. खरात, एस. एस. इंगळे, ई. डी. काळे, आरती खांडेभराड, ए. एस. पारेकर, वैशाली बंगाळे, के. एस. इंगळे, एम. एच. उकांडे, आर. के. दांडगे, के. जी. सुलताने, पी. आर. काळे, एम. ए. अवचार, प्रणिता खरात, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय चव्हाण, नाना भागिले, मनोज शिंदे, गजानन काळे, एस. एन. देशमुख, पी. आर. काळे, के. पी. इंगळे, सचिन पडघण, गजानन सरोदे, प्रनिता खरात, सुरेश मुरकुटे, बी. एफ. दांडगे, आर. व्ही. परीहार, विठ्ठल भालके, समाधान फलके, रामेश्वर उबाळे, एस. एस. जाधव, देविदास शेळके, काळमेघ, गजबसिंग घुसिंगे, कृष्णा सिरसाट, वाय. बी. देशमाने, एन. एल. चौधरी, भरत हिवाळे, प्रभाकर शेजुळ, समाधान गाडेकर, झोरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.