आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्त्यांचा फड:तळणीत कुस्त्यांच्या दंगलीस प्रतिसाद; विविध जिल्ह्यांतून जवळपास दोनशेच्या वर मल्लांनी लावली हजेरी

तळणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील तळणी येथे हिन्दू नववर्षाच्या निमित्त कुस्त्याच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्राच्या विविध जिल्हातून जवळपास दोनशेच्यावर मल्लानी हजेरी लावली. यात विशेष म्हणजे मुलीचा देखील मोठा सहभाग होता. गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोरोना महामारी मुळे या कुस्त्यावर निर्बध असल्याकारणाने हा खेळ होऊ शकला नाही.

वाशीम, बुलढाणा, परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरगांबाद, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा या जिल्हातून मोठ्या संख्येने मल्लानी सहभाग नोदविला. पाचशे रुपयापासून ते दहा हजाराच्या वरचे बक्षीस प्रत्येक कुस्तीसाठी ठेवण्यात आले होते.

आठ वर्षाच्या मुलीपासुन पंचावन्न वर्षाच्या वयोवृद्ध मल्लानी या सर्धत सहभांग घेतला तळणी येथील कुस्त्याची ही परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्तीची आहे कोरोना निर्बध हटवल्यानंतर नविन मराठी वर्षातील हा पहिलाच सण असल्याने मोठया संख्येने कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. कुस्ती समिती मागील आठ दिवसापासून यासाठी परिश्रम घेत आहेत. लोक वर्गणीतून मोठया प्रमाणात बक्षीसांची रक्कम जमा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...