आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:जालना ब्राह्मण सभा कार्यालयात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण सभा जालना येथील कार्यालयात ब्राह्मण सभा व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद देशपांडे यांनी सपत्नीक रक्तदान करून शिबिरास प्रारंभ केला.

उद्घाटन डॉ. पद्माकर सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. शार्दूल राम भाले, डॉ. प्रज्ञा श्रीपाद देशपांडे, यश सोमनाथ पाटसकर, ओंकार कृष्णराव दासखेडकर, शेख जावेद शेख युसूफ, शेख नईम शेख मोहम्मद, सय्यद कलीम आरेफ, फिरोज खान, सतीश सुधाकर देशपांडे, कल्याण लक्ष्मण कुलकर्णी, आशिष श्रीनिवास गोटखिंडिकर, रोहित रमेश चुंबळकर, मिलिंद सुधाकर देशपांडे, धनंजय दत्तोपंत पांगारकर, सतीश उत्तमराव कुलकर्णी, अंकुश प्रल्हाद पाटोळे, गोपी राजाभाऊ मोहिदे, प्रसाद अरुणराव पाटील, संजय देशपांडे, शाम जोशी, दिलीप पोहनेरकर यांच्यासह आदींनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभेचे कल्याणराव देशपांडे, रमेश देहेडकर, डॉ. सुभाष भाले, श्रीकांत शेलगावकर, अश्विनी वासडिकर, डॉ. संजय रुईखेडकर, ॲड. विनोद कुलकर्णी, एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक जितेंद्र वाणी, राहुल कुलकर्णी, नितीन दाभाडे, सचिन निका, महेश शिंदे जनकल्याणचे डॉ. सुनीला कांडलीकर, सुधाकर कुलकर्णी, जोशी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...