आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद‎

केदारखेडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा‎ येथे प्रहार रुग्ण कल्याण समिती‎ जालना जिल्हा लायन्स नेत्रालयाच्या‎ संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी‎ शिबिर घेण्यात आले. यात ३८०‎ रुग्णांनी सहभाग नोंदवला.एकूण ४०‎ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र‎ ठरले. त्यांच्यावर लायन्स नेत्रालय‎ औरंगाबाद या ठिकाणी शस्त्रक्रिया‎ करण्यात येणार आहे.

या वेळी प्रहार‎ रुग्ण कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष‎ श्रीमंता राऊत, डॉ. एस. के. मिसाळ,‎ नारायण मिसाळ, डॉ. शेख, मंगेश‎ देशमुख, संदिप मंजुळे, सुनिल‎ कांबळे, विष्णू जाधव, तुषार चौधरी‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...