आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1145 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ:सेवा पंधरवड्यांंतर्गत वाटूर येथे आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

वाटूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती निमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत जालना येथील आधार बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने व मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर तालुक्यातील वाटूर येथे सर्वरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात १४५ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले.

वैद्यकीय तपासणी डॉ. अमोल भटाणे. डॉ. अंजु वाघमारे यांनी केली. मनिषा अहिरे, रंजना कंकाळ, सुनिता मदने, प्रेमदास चव्हाण, शेख बाबा, शे जमीर शहा, अशपाक, भीमराव आढे, रवि राठोड यांनी सहाय्य केले. उपस्थित महिला, पुरूष, युवक, युवतींना आरोग्याशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती दिली. डॉ अंजू वाघमारे यांनी मुलींना मासिक पाळीमध्ये शरीरात होणारे बदल व माता सुरक्षित तर घर सुरक्षित मातृत्व समान्न हाच आपला अभिमान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...