आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:परतूरच्या विवेकानंदमध्ये "मीच‎ होणार होम मिनिस्टर''ला प्रतिसाद‎

परतूर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य‎ साधून येथील विवेकानंद इंग्लिश‎ स्कूल मध्ये महिला पालकांसाठी ''‎ मीच होणार होम मिनिस्टर '' या‎ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी‎ करण्यात आले होते. संस्थेचे‎ अध्यक्ष संदीप बाहेकर यांच्या हस्ते‎ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात‎ आले. मुख्याध्यापिका संगीता शिंदे,‎ विषय तज्ञ डॉ. स्मिता रोडगे यांची‎ यावेळी प्रमुख उपस्थिती होती.‎ यावेळी विद्यार्थिनींनी महिला‎ दिनाच्या पार्श्वभूमीवर तयार‎ केलेल्या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन‎ देखील भरवण्यात आले होते. या‎ भित्तीपत्रकांच्या माध्यमातून शालेय‎ विद्यार्थीनींनी, स्त्रियांनी विविध‎ क्षेत्रात केलेली प्रगती, स्त्रियांमध्ये‎ असणाऱ्या विलक्षन प्रतिभा आदी‎ बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न‎ केला.‎ कुटुंबाची देखभाल आणि इतर‎ कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना‎ अनेक गृहिणींना स्वतःच्या इच्छा,‎ आकांक्षांना मुरड घालावी लागते.‎

त्यांच्या असणाऱ्या कला गुणांना‎ प्रदर्शित करण्याची संधी मिळत‎ नाही. अशा स्त्रियांसाठी किमान एक‎ दिवस का होईना स्वतःच्या मर्जीने‎ स्वतःसाठी जगण्याचा असावा, या‎ हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले असल्याची माहिती‎ अध्यक्ष संदीप बाहेकर यांनी यावेळी‎ दिली. नितीन दीक्षित यांच्या‎ सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत‎ वाढवली. उषा जगदीश शिंदे यांनी‎ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत‎ मानाची पैठणी जिंकली. उल्का‎ विश्वनाथ वाघमारे आणि श्वेता‎ दीपक शर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय‎ आणि तृतीय क्रमांक मिळविला.‎ ज्योती दिगंबर सुरुशे या उत्तेजनार्थ‎ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या.‎ विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या‎ हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात‎ आले. वर्षभराच्या कालावधीत‎ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या‎ शिक्षिका स्वाती कोस्टा यांचा‎ मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.‎

बातम्या आणखी आहेत...