आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:चित्रकला, रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक दिव्यांग दिन जिल्हाभरातील शाळांत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या,तर जनजागृती रॅलीही काढण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार डायटचे प्राचार्य डॉ. आर. डी. कांबळे, शिक्षणाधिकारी प्राथ कैलास दातखीळ, उप शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाने तसेच समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक राजेशसिंह ठाकूर यांच्यासह तालुकास्तरावरील सर्व विशेषतज्ञ, विशेष शिक्षक यांच्या सहकार्यातून जिल्हातील सर्व शाळांमध्ये ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन, समान संधी दिवस साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा शेलगाव : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेलगाव येथे जागतिक दिव्यांग दिन रॅली काढून घोषवाक्य म्हणून विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. रांगोळी स्पर्धा,भाषण, गीत गायन, नृत्य, स्पर्धा मुलांना त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आली व प्रथम द्वितीय तृतीय ज्यांचे नंबर आले त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राशा बामखेडा : भोकरदन तालुक्यातील बामखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका एस. एस. गादेवाड, सहशिक्षिका ए. टी. मगर, अंगणवाडी सेविका रेणुका तरवटे, लक्ष्मीबाई काळे, विशाल काळे, पालक सय्यद नबीब आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...