आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:पोलिस भरती लेखी सराव परीक्षेला प्रतिसाद

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात होणाऱ्या मेगा पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन- जाफराबाद तालुक्यातील पोलिस भरतीची तसेच विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींनीसाठी लेखी सराव परीक्षा स्पर्धा भोकरदन येथील क्रीडा प्रबोधिनी मैदानावर घेण्यात आली.

सराव परीक्षेसाठी १३०० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. लेखी सराव परीक्षा स्पर्धा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, निर्मलाताई दानवे, माजी जि.प. सदस्या आशाताई पांडे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची उपस्थिती होती. मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...